
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : हिमाचल आणि गोवा या राज्यांची उदाहरणं देत त्या म्हणाल्या, ‘हिमाचल प्रदेश गोव्या सारखे राज्य लसीकरणाचे लक्ष पूर्ण करतात तर आपण का मागे आहेत? लसीकरण ही सामूहिक जबाबदारी आहे. ‘नव्या विषाणूची चिंता सुरू झाल्याबरोबर पंतप्रधानांनी तात्काळ बैठक बोलावली, असं भारती पवार यांनी सांगितलं. पुढे त्यांनी बूस्टर डोसबाबत सांगितले, ‘बूस्टरडोसबाबत ग्लोबल प्रॅक्टिसेस काय आहेत हे पाहिल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. याबाबचत जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप निर्देश दिलेले नाहीत. ‘
विनायक राऊत यांनी भेदभावाचा आरोप केला
भारती पवार यांनी सांगितले की, ‘लोकसभेत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भेदभावाचा आरोप केला. त्यांच्याच नोटिसीने चर्चेला सुरुवात झाली. एकीकडे मुख्यमंत्री पंतप्रधानांचे महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर असल्याबद्दल आभार मानतात आणि दुसरीकडे त्यांचे खासदार सभागृहात असा आरोप करतात. कोरोना हा राजकारणाचा विषय नाही. तसेच महाराष्ट्र सरकारच्या नियमांबद्दल भारती पवार म्हणाल्या, ‘नियम करताना राज्य सरकार कुठल्या बेसवर करतात याचा विचार केला पाहिजे
दिल्लीमध्ये नुकताच एबीपी माझाने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यासोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी बूस्टर डोस, लसीकरण आणि कोरोना या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली.त्यांनी सांगितले, ‘आज 84 टक्के पहिला डोस 47 टक्के दुसरा डोस पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रासह, गुजरात पश्चिम बंगाल अनेक राज्यांमध्ये सध्या लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. लसीकरणाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी आवश्यक तितका पुरवठा आम्ही करतो आहोत आता जबाबदारी राज्यांची पण आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या