
दै चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे: पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे, असं कोल्हे यांनी म्हटलं होतं.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट ऑथेरिटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली आहे.
त्याला ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं आहे? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? असा सवाल आनंद दवे यांनी केली आहे.
अमोल कोल्हे यांना दुःख कशाचं आहे? शिवाजी महाराजांच्या प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? पुणे विमानतळावर पेशव्यांचा उल्लेख असण्याने कोल्हेकुई सुरु झाली आहे. केवळ विमानतळवरच नाही तर संपूर्ण पुणे शहरांत छत्रपतींच्या प्रतिमा, पुतळे असावेत ही आमची आधी पासूनचीच भूमिका आहे, असं आनंद दवे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने राजकारण करणारे, सर्वत्र त्यांचाच उल्लेख करणाऱ्या नेत्यांनाच महाराजांचा विसर पडलाय हे पावलोपावली जाणवते आम्हाला. एवढी वर्ष केंद्रात सत्तेवर असून अगदी नागरी उड्डाण मंत्रिपद असून सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळासाठी हवे तसे प्रयत्न का केले नाहीत? आता सुद्धा त्यासाठी कोल्हे यांनी प्रयत्न करावे. आमच्या शुभेच्छा आहेत. पण शहरातील पेशव्यांचे हे एकमात्र शिल्प असताना ते कोल्हे यांच्या पोटात का दुखतं हे आम्हाला कळत नाही?, असा टोलाही त्यांनी लगावला.