
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :झी मराठीवरील देवमाणूस . या मालिकेचा लवकरच दुसरा सीजन भेटीस येणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता देवमाणूसचा कन्नड रिमेक डॉक्टर कारणा लवकरच प्रेक्षकांना भेटीला येणार आहे.
सध्या मराठी मालिकांची लोकप्रियता वारंवार वाढत आहे. अनेक मराठी मालिकांचे विविध भाषेत रिमेक केले जात आहे. अशाच मधेच आता लोकप्रिय मराठी मालिका देवमाणूस कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मालिकेतील कन्नड लोकप्रिय कन्नड अभिनेता डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र या अभिनेत्याचे नाव अजून समोर आलेले नाही. लवकरच या मालिकेचा प्रोमो देखील समोर आला आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेनं चांगला टीआरपी मिळवला.
अनेक प्रेक्षक न चुकता ही मालिका पाहत होते. मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता किरण गायकवाडच्या अभिनयाचंही कौतुक झालं. लोकप्रिय ठरलेली ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.