
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई – भारतानं 1983 मध्ये विश्वकरंडक जिंकला. आणि देशवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला होता. त्यावर चित्रपट तयार झाला आहे. त्यामध्ये रणवीरनं एक महत्वाची भूमिका साकारली आहे. तो कपिल देवच्या भूमिकेत आहे. तर कपिल यांच्या पत्नीची भूमिक दीपिकानं केली आहे. सध्या त्यावर कपिल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा सुरु झाली आहे. दोन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगच्या 83 नावाच्या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
1983 मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत कपिल देव यांनी घेतलेला विनिंग कॅच आणि त्यांनी केलेली खेळी आजही चर्चेचा विषय असतो. आपल्या बिनधास्त प्रतिक्रियेबद्दलही कपिल देव ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी 83 चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यात रणवीर आणि दीपिकाची भूमिका पाहून अनेकांनी त्यांचे कौतूकही केले आहे. यासगळ्यावर जेव्हा कपिल देव यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी वेगळं मत यावेळी व्यक्त केले. कपिल देव यांची पत्नी रोमी देवची भूमिका दीपिकानं केली आहे.
कपिल देव यांनी सांगितलं की, मी जेव्हा 83 चा ट्रेलर पाहिला तेव्हा आनंद वाटला. त्याला ट्रेलरला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. माझ्या काही पारिवारीक गोष्टींचा उल्लेख त्यात आला आहे. पत्नीचाही उल्लेख त्यामध्ये आहे. मात्र केवळ ट्रेलरमधून सांगता येणं कठीण आहे की, तिच्या वाट्याला किती मोठी भूमिका आली आहे ते. मुळात ती या चित्रपटामध्ये काय काम करत आहे असा प्रश्नही कपिल देव यांनी उपस्थित केला आहे. यावेळी कपिल यांनी रणवीरचे कौतूक केले आहे. रणवीर आणि दीपिका यांनी पूर्वीदेखील अनेक चित्रपटांमधून एकत्रितपणे काम केले आहे.