
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
डहाणू.
1) सदर पूजा आत्महत्या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून आम्ही सखोल चौकशी करत असून जर कोणी दोषी आढळले तर कठोर कायदेशीर कारवाई करू.
पोलिस निरीक्षक.
डहाणू.
2) पूजा आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.
सुभाष लहांगे.
अध्यक्ष .डहाणू
बी.जे. पी.
आदिवासी विकास आघाडी.
पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव व आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष श्री अनंता वनगा यांच्या कडे पूजाचे वडील यांनी आपल्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी मयत पूजा व आपल्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
सदर प्रकरणी सामाजिक नेते अनंता वनगा यांनी मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.पोलीस महासंचालक,
*महाराष्ट्र राज्य मा.पोलीस अधिक्षक पालघर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर घटना अशी घडली
डहाणू तालुक्यातील दाभोण ग्रामपंचायतचे सरपंच नरेश लहांगे यांच्या वीस वर्षीय मुलीने(पुजा लहांगे) आत्महत्या केली पण आत्महत्येस जबाबदार असलेल्यां वर गेल्या दोन महिन्या पासून आज पर्यंत गुन्हे दाखल झाले नाहीत. म्हणुन अनंता वनगा कडे पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे.
पिडीत वडिलांच्या सांगण्यानुसार माझी मुलगी कु. कै. पुजा नरेश लहांगे वय २० वर्ष ही तलासरी येथे गोदुताई शामराव परुळेंकर वरिष्ठ महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती पण करोना मुळे महाविद्यालय बंद असल्याने ती डहाणू तालुक्यातील साखर धरण परिसरातील दाभोन येथील आपल्या घरी आली व बोईसर येथील साईनीत क्लिनिक मध्ये कामाला लागुन कुटुंबाला हातभार लावत होती.
त्याच दरम्यान पूजा ला संजय रावते याने
प्रेमाच्या जाळ्यात ओढुन लग्नाचे आमिष दाखवुन एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करुन माझ्या एकुलत्या एक मुलीला आत्महत्या करायला लावणाऱ्या संजय रावते व त्याला साथ देणाऱ्या सिलिन लहांगे यांच्या विरोधात तक्रार देऊन सुद्धा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही,उलट आम्हालाच पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला बोलावुन पोलिसांना जसे पाहिजे तसे जबाब घेतले,दोन महिने उलटुन गेले तरी सुद्धा माझ्या मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर अद्याप गुन्हे दाखल झाले* *नाहीत म्हणुन आपल्याकडे माझ्या मुलीला न्याय मिळवुन देण्यासाठी विनंती करतो .
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण केली आहे. पुजा लहांगे हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन लग्नाचे आमिष दाखवुन २८/०९/२०२१ रोजी नागझरी येथील लॉजवर नेवुन रात्रभर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व १/१०/२०२१ रोजी रस्त्यात संजय रावते व त्याला साथ देणारा सिलिन लहांगे यांनी पूजा लहांगे घराच्या रस्त्याने येत असताना मध्येच अडवुन सदरचा प्रकार कुणालाही सांगु नको माझे लग्न झाले आहे माझी बदनामी होईल असे सांगुन निघुन गेले, घाबरलेल्या अवस्थेत व मानसिक तणावात असलेल्या पुजाने शितपेयामध्ये विष टाकुन नंतर विष प्राशन केले व २/१०/२०२१ रोजी ग्रामिण रुग्णालय कासा येथे उपचारा दरम्यान कु. पुजा लहांगे हिचे निधन झाले.
सदर घटनेला २ महिने झाले परंतु गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले नाही. त्या मुलीला लॉजवर नेऊन जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळेस संजय रावते व त्याच्या सोबत अजुन कोण कोण होते .शारिरीक संबंध करते वेळी आरोपींनी व्हिडिओ शुटिंग केली नसेल ना याची डहाणु पोलीसांनी चौकशी न करता हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे,
म्हणुन सदर प्रकरणाची चौकशी गुन्हे अन्वेषण शाखा पालघर यांच्याकडे वर्ग करुन कु. पुजा लहांगे हिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यां विरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरुन भविष्यात असे प्रकार रोखण्यास मदत होईल .