
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड जिल्ह्यातील लाखो का सभेच्या माध्यमातून पीक विमा मिळवून देणाऱ्या शेतकरी, युवक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करणारे कॉ. अॅड. उद्ध) अजय गंगाधरअप्पा बुरांडे यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बीड जिल्हा सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली.
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे २३ वे बीड जिल्हाधिवेशन कॉ. विठ्ठल मोरे नगर, तेलगाव येथील मानवी हक्क अभियान च्या संस्थेत संपन्न झाले. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ उदय नारकर (कोल्हापूर), कॉ. किसन गुजर (नाशिक) व कॉ. पी. एस. घाडगे (बीड) यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाले.
यावेळी कॉ. अजय बुरांडे यांनी मागील तीन वर्षांचा अहवाल जिल्हाभरातून आलेल्या प्रतिनिधी समोर मांडला तसेच विविध प्रश्नावर चर्चा झाली. या अधिवेशनात जिल्ह्यातील राजकीय, सामाजि, आर्थीक, विषयासह विद्यार्थी, युवक, शेतकरी, शेतमजुर, कस्नगार व कर्मचरिवर चर्चा करण्यात आली.
• पुढील काळात माकप जनतेच्या प्रश्नावर लोकशाही मार्गाने आंदोलन उभा करून प्रश्नाची सोडवणुक करुण घेईल असा विश्वास नुतन जिल्हा सचिव काँ बरांडे यांनी व्यक्त केला.