
दैनिक चालू वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख। सर्वच क्षेत्रात अंबाजोगाईच्या मातीने अनेक मोठी माणसं दिली. अंबाजोगाईचा साहित्यिक, सांस्कृतिक असा अनमोल ठेवा, जतन करा हा वारसा अखंडपणे सुरू ठेवा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरुण डावळे यांनी केले. येथील जेष्ठ नागरिक संघ व मराठवाडा साहित्य परिषद, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यकवी मुकुंदराजस्वामी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणुन डॉ. अरुण डावळे बोलत होते.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. कमलाकर कांबळे, विद्या कांबळे, स्वगताध्यक्ष कमल , बरुरे, मावळते अध्यक्ष गणपत व्यास, मावळते स्वागताध्यक्ष प्रा. संतोष मोहिते, जेष्ठ नागरिक संघाचे कुंडलिक पवार, सरस्वतीफड, मसाप शाखेचे अध्यक्ष अमर, हबीब, उपाध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, कार्यकारिणी सदस्य दगडु लोमटे, डॉ. श्रीहरी नागरगोजे, एस. बी. सय्यद, उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. डावळे म्हणाले प्राचीन काळापासून अंबाजोगाई शहराची वेगळी ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीचे केंद्र असलेल्या या शहराची स्वतंत्र ओळख आहे. ती जोपासा. या मातीतच उपजत गुण
असल्याने सर्वच क्षेत्रात नवीन पिढी र्माण झाली आहे. या पिढीनेअंबाजोगाई वारसा जपला पाहिजे. असे सांगुन मातृभाषेचा केवळ अभिमानच न बाळगता त्या भाषेतूनच शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य द्या. तसेच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा ठराव संमेलनात घ्यावा अशी मागणी ही त्यांनी केली.