
दै चालु वार्ता औरंगाबाद
प्रतिनिधी मोहन आखाडे
औरंगाबाद : जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात प्रेमविवाह केल्यामुळे अल्पवयीन भावानेच सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. पतीने पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
किशोरी मोटे (वय.१९) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पुण्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी ते लाड़गाव शिवारात आले होते. याची माहिती तिच्या आई आणि भावाला मिळताच ते लाड़गाव शिवारात गेले. तिथे समोर बहिणीला पाहुन राग अनावर झाला आणि त्याने कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले. यात तिचा जागीच मृत्यु झाला. याचवेळी तिच्या पतीने पळ काढल्याने त्याचा जीव वाचला.
नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन भावाला आणि आईला ताब्यात घेतले आहे.