
दै.चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :सविस्तर माहिती अशी की, पिंपळदरी ता. सिल्लोड येथील ज्योती गव्हाणे आणि त्यांचे पती सदानंद गव्हाणे हे अल्पभूधारक शेतकरी होते. मागील काही वर्षांपासून शेतीमधून अपेक्षित उत्पन्न हाती येत नसल्याने व डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असल्याने या दाम्पत्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
ज्योती गव्हाणे यांनी शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपल्या राहत्या घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली तर या घटनेनंतर काही मिनिटांतच ज्योती यांच्या पतीने व्ह्यू पॉइंट रस्त्यालगत असणाऱ्या एका आंब्याच्या झाडाला सदानंद यांनी गळफास घेतला. ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं खाली उतरवून उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. पण वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पिंपळदरीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या दाम्पत्याला दोन लहान मुले आहे.