
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
बालाजी देशमुख केज नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत असल्याने शहरात चांगलेच वातावरण तापले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ डिसेंबर शेवटची आहे. आतापर्यंत फक्त दोघांनी अर्ज दाखल केले असले तरी खऱ्या अर्थाने उद्यापासून अर्ज दाखल होतील. या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस , राष्ट्रवादी , जनविकास आघाडी यांचे स्वतंत्र पॅनल पडणार असून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षाचे वेगळे पॅनल राहतील अशी चर्चा होत आहे. या दोन्ही पक्षाने अद्याप मात्र कुठलीही ठोस भूमीका घेतली नसल्याने भाजप , शिवसेनेला काही ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ येईल असेही बोलले जात आहे. नगर पंचायत निवडणुकीमध्ये चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे दिसते. या नगर पंचायतीवर पाच वर्ष काँग्रेसची सत्ता होती. पुन्हा आपली सत्ता राखण्यासाठी खा. रजनीताई पाटील या प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्षाचा वेगळा पॅनल निवडणुकीत उतरणार आहे. काँग्रेसने अद्यापपर्यंत कुठल्याही इतर पक्षाशी आघाडी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र लढेल असं दिसतं. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी निवडणुका होणार आहे. तिसरे पॅनल हारुण ईनामदार याचं पडणार असल्याचे बोललं जातं. इनामदार यांनी जनविकास आघाडी स्थापन केली. या आघाडीमध्ये कोण कोण सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना आणि भाजपाने आपली भूमीका अजून समोर आणलेली नाही. हे दोन्ही पक्ष वेगळं लढतेल असं आजच्या परिस्थितीवरुन दिसतं आहे. काही ठिकाणी या दोन्ही पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ येईल असही बोललं जातं आहे. या निवडणुकीमध्ये तिरंगी , चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ डिसेंबर शेवटची तारीख आहे. आतापर्यंत दोघां जणांनी अर्ज दाखल केलेले आहे. उद्यापासून अर्ज दाखल करण्याच्या प्रकियेला वेग येईल. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात येत आहे.