
संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन प्रणित कै.भा.प्र.पाटील डीएड मंच चा उपक्रम
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-माधव गोटमवाड
परभणी:
संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशन चे परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे काम वाखण्याजोगे आहे. फाऊंडेशन च्या माध्यमातून अनेक कुटूंबांना मदत केली गेली आहे. निराधार, गरीब, गरजू कुटूंबांना शिलाई मशीन देणे, घर बांधून देणे, मिरची कांडप यंत्र देणे, व्यवसायाला मदत करणे, वृक्षरोपण करणे, एक मित्र -एक पुस्तक चळवळ, एक मित्र- एक वृक्ष चळवळ, पूरग्रस्तांना मदत असेल या सारख्या अनेक उपक्रमातून फाऊंडेशन च्या वतीने मदत करण्यात आलेली आहे. हे फाऊंडेशन कै.भाई प्रभाकरराव पाटील डीएड काॅलेजचा माजी विद्यार्थी असलेला सध्या शिक्षक म्हणुन कार्यरत असलेला श्यामसुंदर निरस यांच्या संकल्पनेतुन उभे राहिलेले असून काॅलेजच्या अनेक मित्रांचे सहकार्य निरस यांना सुरवातीपासुनच लाभले. त्यांच्या या सामाजिक चळवळीला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे म्हणुन काॅलेजचे माजी प्राचार्य डाॅ.केशव इंगोले,सुभाषजी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.अंगद शेंडगे,केशव सोळंके,राजपाल दुर्गे,श्रीकृष्ण घाडगे,लखन उगीले,संग्राम पातळे,भाऊसाहेब कदम इत्यादीनी मंच समूहाच्या माध्यमातून एकत्रित येत ही चळवळ उभी केली आहे.आज दि.05/12/2021 रोजी मौजे साळापुरी ता. जि.परभणी येथील विधवा भगिनी चिंगूताई मुजुळनाथ कुकडे यांना अपंग दिनाचे व महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शेळी भेट देण्यात आली. चिंगुताईंच्या पतीचे मागच्या वर्षी निधन झाले होते. त्यामुळे त्या अत्यंत बिकट परिस्थितीत आपल्या दोन लहान मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालवत आहेत. त्यांना शेती नसल्याने व मोलमजुरी शिवाय पर्याय नसल्याने ताईंना जगण्याचे बळ मिळावे म्हणून फाऊंडेशन व मंच च्या वतीने शेळी भेट देण्यात आली.
फाऊंडेशनच्या माध्यमातुन प्रत्येक महिन्याला एका निराधार भगिणीस मदत म्हणून शेळी भेट दिली जाते. देऊ बळ जगण्याचे या कार्यक्रमार्तगंत मंच तर्फे यापूर्वी पडेगाव व चाटोरी येथील गरजूंना शेळी भेट देण्यात आलेली आहे. आपल्या मनोगतातून फाऊंडेशन चे अध्यक्ष श्यामसुंदर निरस यांनी फाऊंडेशन उभारणी व कार्याचा लेखाजोखा मांडला. पुढील कार्यक्रम व संकल्प व्यक्त केला.नितीनजी लोहट यांनी फाऊंडेशन व मंच च्या कार्याचे कौतुक केले व मी आपल्या सोबत आहे अशी ग्वाही दिली. गणेशभैय्या घाडगे यांनी मंच व चळवळीला जी काही मदत लागेल त्यासाठी मी आपल्या सोबत आहे असे सांगितले.आजच्या कार्यक्रम स्थळी मा. श्री गणेशभैय्या घाटगे (सभापती जिल्हा परिषद परभणी),श्री नितिन लोहट सर, गजानन घाटगे (चेअरमन साळापुरी), भालचंद्र घाटगे, ओमप्रकाश घाटगे, गोपीराज घाटगे, माणिक मात्रे यासह फाउंडेशनचे अध्यक्ष व मंच चे सदस्य
श्यामसुंदर निरस , केशव सोळंके, लखन उगिले, धर्मराज शिंदे, प्रदीप कदम व श्रीकृष्ण घाटगे व साळापुरी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव सोळंके यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण घाडगे यांनी केले तर आभार लखन उगीले यांनी मानले. फाऊंडेशन व मंच मध्ये जास्तीजास्त सदस्य यांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन सुभाष ढगे, अंगद शेंडगे व डॉ. केशव इंगोले यांनी केले.