
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पन्हाळा गडावरचा मुख्य रस्ता तेवीस तारखेला पहाटे दीडशे ते दोनशे फूट खाली गेला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याचे टेंडर काढून छप्पन दिवसात काम करून देण्याचे पन्हाळगड वासियांना आश्वासन दिले व नगरपालिकेकडून पर्यायी रस्त्याची सोय करण्यात आली होती पण तो पर्यायी रस्ता पाऊस पडल्यानंतर चिकलनिर्माण होतो व अनेक अपघात या ठिकाणी होतात तो अत्यंत धोकादायक असा पाऊस पडल्या नंतर रस्ता होतो मुख्य रस्त्याने थोड्या प्रमाणात प्लेटा टाकून या ठिकाणी टू व्हीलर सोडण्यात आल्या होत्या परंतु काल अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कोळी यांनी अचानक येऊन हा टू व्हीलर साठी रस्ता बंद करण्यात आला असे जाहीर केले व रस्ता बंद झाला दोन दिवस अवकाळी पावसाने अक्षरशा पन्हाळा व परिसर झोडपून काढले त्यामुळे पर्यायी रस्त्याची दुर्दशा व ज्या ठिकाणी टू व्हीलर येत होत्या मुख्य रस्त्यातून त्या अचानक बंद झाल्यामुळे गावकऱ्यांचे व पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले अनेक पर्यटक इथूनच परत गेलेत त्यामुळे पन्हाळा गडावरचे गाईड व रिक्षा ड्रायव्हर झुणका भाकर स्टॉलधारक हॉटेल लॉजिंग बोर्डिंग खानावळ धारक व घरगुती पद्धतीचे जेवण करून देणारे छोटे मोठे व्यावसायिक करमणुकीचे खेळाच्या गाड्या तून पर्यटकांची करमणूक करणाऱ्या व्यवसायिक आहेत संपूर्ण पन्हाळगड हा पर्यटन वर अवलंबून आहे इथल्या रहिवाशांची कुठल्याही प्रकारची शेती या शेतीपूरक व्यवसाय नाही तसेच सर्वच हातावरचे पोट असणारे माणसं या पन्हाळगडावर राहतात या माणसाचे अत्यंत या तीन वर्षात हालाखीचे जीवन जगावे लागत आहे पहिल्या वर्षी रस्ता वाहून गेला होता दोन वर्ष कोरोना च्या दोन लाटा आल्या त्यामुळे इथले व्यवसायिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत तसेच सर्व तालुकास्तर ऑफिस वर असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना व तालुक्यातील नागरिकांना याची खूप अडचण निर्माण होत आहे त्यामुळे यावर मोठा आवाज उठणार आहे
मंगळवार दि ७ / १२ / २०२१ रोजी पन्हाळा तहसिल कार्यालयासमोर ठिक १२ .०० बोंबाबोंब आंदोलन प्रशासनाच्या व शासनाच्या बेजबाबदारपणामुळे.बुधवार पेठ ते रेडेघाट दरम्यान झालेल्या निकृष्ट कामामुळे.जकात नाकात नाकाजवळ ढासळलेल्या धक्क्याचे संथगतीने चालू असलेल्या कामामुळे ते काम छप्पन्न दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करून देणार होते ते 90 दिवस झाले तरी आहे त्या ठिकाणीच काम आहे त्यामुळे पन्हाळा नागरिक,व्यावसाईक.सर्वसामान्य नागरीक .रुग्ण.पर्यटक .वृध्द,स्त्रीया.शालेय विध्यार्थी.वहातुकदार,प्रशासकीय कामासाठी येणारे सर्व सामान्य नागरिक यांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असुन आर्थिक हव्यासापायी संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार नागरिकांची आर्थिक.मानसिक.शारिरीक फसवणुक करत आहे .संबंधित बेजबाबदार प्रशासनाचा जाहीर निषेध करणे साठी,जकात नाक्यावरील ढासळलेल्या धक्क्याचे काम जलदगतीने करणेसाठी व मुख्य रस्त्यावरून टू व्हीलर सोडण्यासाठी .पन्हाळगडावर येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा या न्याय मागणीसाठी व बेजबाबदार प्रशासनाला जागे करणेसाठी मंगळवार दि ७ / १२ / २०२१ रोजी १२ .०० वा पन्हाळा तहसिल कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणेत येणार असुन कार्यकर्त्यांनी संविधानिक मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला वेळेत उपस्थित राहावे.अशी माहिती भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत कांबळे ( आप्पा ) राजू सोरटे (दादा ),अक्षय सोरटे,शितल गवंडी,शहानवाज मुजावर,पिंटू चव्हाण,राजू काजी,राहुल भोसले,राजू नगरजी,शिवसेना शहर प्रमुख मारुती माने ,चेतन राऊत,फरीद मुल्ला,यांनी दैनिक चालू वार्ता ला माहिती दिली