
दै.चालु वार्ता कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
दत्ताञय एमेकर सर यांचा आनोखा उपक्रम
कंधार
कंधार म्हटले की,प्रथम आठवते ती चळवळ माजी खासदार व आमदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,विविध सत्याग्रहाचे निर्माते डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांनी ,चळवळीच्या माध्यमातून कंधारचे नाव ठळक केले आहे झाले आहे.सध्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून आपला वेगळा ठसा कंधार शहरात उमटला आहे.ऐतिहासिक कंधार शहरातील नगर परिषदेच्या प्रांगणातील,दलितोध्दारक, भारतीय संविधान ग्रंथ राजाचे संविधानकार, अर्थतज्ञ,विचारवंत,वैचारिक खजिना,विश्वस्तरीय ग्रंथवाचक,अलौकिक ग्रंथसंपदा निर्मितीकार बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी ६५ अशोक चक्र असलेला अशोकचक्रहार, कोरोना महासंकटात भाऊचा डबा हा सामाजिक मानवतेचा उपक्रम अखंडीत राबवणारे अन् अनेकानेक गरजुंना मदत करुन आधार देणारे,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे युवा अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांच्या समर्थ हस्ते बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांना अर्पण करुन अनोखे अभिवादन करण्यात आले.हा अनोखा उपक्रम मला वाटते महाराष्ट्र राज्यात नव्हे देशातप्रथमच होत आहे.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार या टोपण नावाने सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा हे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्यांचा हातखंड आहे.हा उपक्रम महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यानेच करुन महामानवांना अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी वकिल बांधव, नगराध्यक्ष प्रतिनिधी,विद्यमान नगरसेवक शाहूभाऊ नळगे,नगरसेवक डाॅ.दीपक बडवणे, पत्रकार सिकंदर भाई, संपादक माधवराव भालेराव,माजी नगरसेवक कांबळे, बापुराव वाघमारे,पत्रकार बोटेवाड सर प्रा.गरुडकर, बालाजी परोडवाड, अभंग लोखंडे,आदीसह सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.