
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी अरुण भोई
दि. १ व २ डिसेंबर २०२१ या कालावधीतील पुणे जिल्ह्यात एकूण ७८५ मिली लिटर पाऊस पडला असून, यामध्ये थंडीमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुमारे २००० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे. हा आकडा प्रथमदर्शनी असून जिल्ह्यातील काही भागात अद्याप पंचनामे सुरु असल्यामुळे नुकसानीचे आकडे वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काही ठिकाणी घराच्या पडझडी देखील झालेल्या आहेत. कोराना सारख्या महाभीषण आपत्तीचा सामना करीत असताना सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यातच नव्याने उभा राहिलेल्या अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे आणखीच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीने मिळणे आवश्यक आहे. तरी, दि. १ व २ डिसेंबर २०२१ या कालावधीत पुणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व बाधित नागरिकांना भरपाई मिळणेबाबत आपणाकडून संबधितांना आदेश व्हावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा. नामदार श्री. अजित दादा पवार साहेब, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री मा. नामदार श्री. विजय वडेट्टीवार साहेब पशुसंवर्धन मंत्री मा. नामदार श्री. सुनील केदार साहेब यांचेकडे दौंड चे आमदार राहुल कुल केली आहे.