
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड तालुक्यातील हिंगणी (बु) येथील अविनाश कल्याण आंधळे हा जवान दिल्लीनजीक शहिद झाला आहे. २९ वर्ष वय असलेल्या अविनाश यांची ६ वर्षांपूर्वी सैन्यदलात निवड झाली होती. दिल्लीनजीक कर्तव्यावर असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले.. अविनाश यांचे वडील कल्याण आंधळे हे शेतकरी आहेत. अविनाश यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. सोमवारी दुपारी अविनाश यांचे पार्थिव हिंगणी (बु) ता. बीड येथे आणले जाणार असून येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अविनाश आंधळे या जवानाच्या निधनाने हिंगणी गावात शोककळा पसरली आहे.