
विशाल खुणे
दैं चालू वार्ता पुणे शहर प्रतिनिधी, (पुणे)
गेले ०४ दिवस सुभाष सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळ बुद्धविहार वसाहतीतील नागरिकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, भारतीय दलित कोब्रा प्रमुख एड विवेकभाई चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे स्वप्निल वाघमारे, रितेश गायकवाड व भारतीय दलित कोब्राच्या महिला शहराध्यक्ष लता ढेपे, यांच्या शिष्टमंडळाने मा. जिल्हाधिकारी देशमुख यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली व जलसंपदा विभागाने ताब्यात घेतलेली तथागत गौतम बुद्धांची मूर्ती परत देण्याचे जलसंपदा खडकवासला विभागाचे प्रमुख चोपडे यांना सुचित केले. त्यानंतर माजी राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर व कोब्रा राजा भाई विवेक चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन अन्नदान आंदोलन समाप्त केले. यावेळेस महाराष्ट्र दलित सेवा तसेच सर्व संघटना चे पदाधिकारी उपस्थित होती.