
दैनिक चालु वार्ता,शिरपूर
प्रतिनिधी:-महेंद्र ढिवरे
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विद्यालयात दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले . प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार श्री. एस एम पाटील सर यांनी अर्पण करून नमन केले यावेळी प्राचार्य श्री आर एफ शिरसाठ सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विध्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन आदरांजली वाहिली .निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात 25 विद्यार्थ्यांनी व उच्च माध्यमिक गटात 20 विद्यार्थ्यांनी भाग घेतला परीक्षक म्हणून श्री व्ही एस ईशी, एस के कोळी यांनी पाहिले यावेळी पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील ,एन डी चव्हाण, एस जे पाटील,एस एन पाटील , पी टी चौधरी,व्ही डी पाटील यांनी अभिवादन केले सूत्रसंचालन एस आर देसले यांनी केले प्रास्ताविक व आभार राष्ट्रीय सेवा योजना एककचे कार्यक्रम अधिकारी श्री एन वाय बोरसे यांनी केले राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले