
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित करण्याचं काम वीज वितरण कंपनी करत असल्यामुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान होत आहे यासाठी जिजाऊ ब्रिगेड ने पुढाकार घेऊन उपकार्यकारी अभियंता लोहारा यांना निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये म्हटले आहे की
जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर अखेर पर्यंत80 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. याला कारणीभूत आपल्या खात्याची व कार्यालयाची कामाची पद्धत जबाबदार आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनेमध्ये सहभागी होत आपले नियमाप्रमाणे विद्युत आकारापोटी रक्कमांचा भरणा केलेला आहे. योजनेतील अटी शर्ती प्रमाणे, येत्या मार्चपर्यंत उर्वरित रकमा भरणा करण्याची शेतकरी तयारी करत आहेत असे असताना आपल्या खात्यामार्फत डीपी वरूनच विद्युत पुरवठा खंडित केला जातो आहे व पाणी असतानाही शेतकऱ्यांचे वीज पुरवठ्याच्या अभावी कुचंबना करून ,नियोजनबद्ध पद्धतीने गळचेपी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कडून आपण वर्षभराचा विद्युत आकार वसूल करत असतात. यापोटी त्याला योग्य दाबाने सलग विद्युत पुरवठा कधीच करत नाही. याउलट कांही ना कांही कारण काढून त्याचा विद्युत पुरवठा खंडित करून हा वाचवलेला विद्युतवापर इतरत्र करून त्यावर आपले खाते व ऑफिस पैसा कमवते . अशा पद्धतीने शेतकऱ्याकडून सेवा न देता पैसा वसूल करता व त्याच्या हक्काच्या देय विद्युतपुरवठ्यातून ,इतरत्र विद्युत पुरवठा करता वअशा पद्धतीने दुहेरी पैसा आपले खाते कमवते . अशाप्रकारे आपले खाते शेतकऱ्याची फसवणूक करते व शेतकऱ्याचे हजारो कोटी रुपयाचे नुकसान करते
आपले खाते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यास पूर्णतः, जवाबदार आहे.
आपल्या खात्यामार्फत शेतकऱ्यासाठीचा विद्युत वापर ठरलेला असताना त्याचा वापर इतरत्र करून शेतकऱ्याची फसवणूक आपले खाते करते.
आपल्या खात्याचे मनमानी काम, दिशाहीन कार्यवाही व धोरणशुन्य कार्यपद्धती यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या नुकसानीस आपण जबाबदार आहात.
विजेच्या एका युनिटवर शेतकऱ्यांकडून व इतर ग्राहकाकडून दुहेरी वसुली करत आपले कार्यालय उघड उघड लूट करते. हा दिवसाढवळ्या खात्यामार्फतची शेतकऱ्यावर धाड असून विचारपूर्वक नियोजनबध्द भ्रष्टाचार आहे.
अर्थातच आपल्यावर 302 ,420, राष्ट्रीय व सामाजिक नुकसान, भ्रष्टाचार या सदराखाली गुन्हे का नोंदवू नयेत. यामध्ये सुधारणा न झाल्यास वरती नमूद बाबनिहाय शेतकऱ्याची प्रकरणे नोंदवून त्यांच्या सहभागाने गुन्हे नोंदणीच्या कामास संघटना सुरुवात करत आहे ,याची नोंद घ्यावी आसे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन वरिष्ठांशी संपर्क साधला व त्यानंतर लगेच चोवीस तासाच्या आज लोहारा तालुक्यातील वीज कनेक्शन पूर्ववत करण्यात येतील असे आश्वासन जिजाऊ ब्रिगेड यांना देण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रंजनाताई हासुरे कार्याध्यक्षा प्रतिभा ताई परसे, गोकर्णा ताई कदम शितल ताई गोरे संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष महेश गोरे ओमकार चौगुले,शंभू वाले,सुरज माळवदकर,महेश पांचाळ आदी कार्यकर्ते, तसेच अनेक शेतकरी ही उपस्थित होते सदर निवेदन देत असताना उपस्थित शेतकऱ्यांनी जिजाऊ ब्रिगेडचे कौतुक करून जिजाऊ ब्रिगेडच्या आभार मानले.