
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-माधव गोटमवाड
भोकर:-
भोकर तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर विजय बोंदीरवाड यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने, त्यांचा भोकर तालुक्यात सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. भोकर येथील डॉ. विजय बोंदीरवाड यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड झाल्याने त्यांचा दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी, सत्कार कार्यक्रम ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष गणेश यादव यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते हजर होते. डॉक्टर विजय बोंदीरवाड यांच्या निवडी निमित आयोजीत कार्यक्रमास नगरसेवक तथा आडत व व्यापार संघ अध्यक्ष, गोल्ला गोलेवार समाज सेवा संघ जिल्हाध्यक्ष श्री संजय आऊलवार, सरपंच संघटने चे अध्यक्ष माधवराव अमृतवाड,ओ बी सी जिल्हा उपाध्यक्ष गणेश यादव, शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर, सरपंच संघटनेचे तथा बेंबरचे उपसरपंच श्री अंबादास अटपलवाड, युवा नेते संदिपगौड पाटील, युवक काँग्रेसचे विधानसभा प्रमुख सौदागर, मन्नेरवारलु संघटनेचे नव्वोड सर, सामाजिक कार्यकर्ते योगेश भोकरकर, दिगाबर पप्पुलवाड आदिच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ. विजय बोंदीरवाड यांचा सर्व पक्षीय कार्यकर्त्या कडुन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक संजय आऊलवार, सरपंच संघटनेचे माधवराव अमृतवाड, शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर, सरपंच संघटनेचे अंबादासअटपलवाड, मन्नेरवारलु नेते नवोड सर यांची स्वागत पर भाषणे झाली. या कार्यक्रमास श्रीराम बोरोड, संतोष बहिरवाड, दिगंबर बोंदिरवाड, राजू अरसलवाड,शशिकांत जोगे,सुनील गोटमवाड, अभेदकुमार यकुलवाड, योगेश भोकरकर, रामलु उरुडवाड,राजेश बोरोड, योगेश दयलवाड , सह अनेक जन हजर होते.