
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
भानुदास पवार
दिल्ली ६ डिसेंबर-पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचा नेहमीच असा प्रयत्न असतो कि युवकांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागावा. याहेतूने युवकांनी छोटे मोठे उद्योग सुरु करून तसेच इतर छोट्या मोठ्या क्षेत्रात युवकांनसाठी रोजगार निर्मिती व्हावी यासाठी पंतप्रधानांनी मुद्रा कर्ज योजनेची सुरवात केलीली आहे. सदर मुद्रा कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल का? तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी किती कालावधी लागतो याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभा अध्यक्ष यांचे मार्फत लोकसभेत वित्त मंत्रालयास प्रश्न केला.
सदर मुद्रा कर्ज योजनेचा लाभ आजचा सुशिक्षित शेतकरीसुद्धा घेऊ इच्छित आहे. जाणेकरून अश्या योजनाच्या माध्यमातून देश्याच्या अर्थव्यवेस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी शेतकऱ्याच्या माध्यमातून मदत होईल. त्या शेतकऱ्याच्या माध्यमातून छोटे मोठे प्रोसेसिंग युनिट ठीक ठिकाणी लावण्यता येतील. या योजनेच्या माध्यमातून बँक युवकांना छोटे मोठे उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज देते. परंतु कर्ज देण्यासाठी संबधित बँक खूप विलंब लावते त्यासाठी सुधा काही वेळेची मर्यादा लावता येईल का? असा प्रश्न खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला.
त्यासंदर्भात संबंधित वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी उत्तर देतांना सांगितले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना शेती जोडउद्योग सुरु करण्यासाठी मत्स्य पालन, पशुधन संगोपन, कुकुट पालन, मधुमक्षिका पालन त्याचप्रकारे शेतीसाठी उपयोगात येणारी अवजारे जसे ट्रॅक्टर, पावर ट्रिलर इत्यादी अवजारे विकत घेण्यासाठी १० लक्ष रुपयापर्यंतची रक्कम कर्ज स्वरुपात उपलब्ध करता येत असते. त्याचप्रमाणे महिला उद्योजकांसाठी सन २०२१ पर्यंत या योजनेच्या माध्यमातून २१.५२ कोटी रुपये कर्ज रुपात मंजूर करण्यात आलेले आहे. ह्या योजनेच्या माध्यामातून सन २०१५ ते २०१८ या तीन वर्ष्याच्या कालावधीत १.१२ कोटी नवीन रोजगार निर्माण होण्यास मदत झालेली आहे. तसेच प्रधानमंत्री मुद्रा योजने मध्ये उद्योजकांसाठी कर्ज मंजूर होण्यासाठी १ ते ५ लाख रु. रक्कमसाठी १४ दिवसांचा कालावधी तर ५ ते १० लाख रु. रक्कमसाठी २१ दिवसांचा कालावधीची मर्यादा आहे.
तसेच मुद्रा कर्ज योजना मध्ये छोटे व्यापारी, नवउद्योजक व शेतकरी यांना येणाऱ्या अडचणी बद्दल वित्त मंत्रालय मार्फत लवकरच योग्यत्या उपाय करण्यात येतील याबद्दल वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांना लोकसभा अध्यक्ष यांचेमार्फत आश्वासन दिले.