
दैनिकचालू वार्ता
मिलिंद खरात
पालघर प्रतिनिधी
वाडा तालुका
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त,वाडा शहरातील आ. ल.चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयात महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले त्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. पाटील सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच वाडा शहरात वाडा काॅग्रेस कार्यालयात महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला अभिवादन करताना पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा,वाडा तालुका सेवादल अध्यक्ष जगदीश केणे,वाडा शहर अध्यक्ष संदीप कराळे,राजेद्रजी उपस्थित होते. तसेच तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.