
दैनिक चालू वार्ता
मिलिंद खरात
पालघर जिल्हा प्रतिनिधी
*जि.प. शाळा डोहोळेपाडा येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित.*
जिल्हा परिषद शाळा डोहोळेपाडा ,केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे *विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ठीक 11 वाजता करण्यात आले*
*विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून व माजी अध्यक्ष अशोक म्हसकर यांनी मेणबत्ती प्रज्वलन करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले.तसेच कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य कोकण विभाग उपाध्यक्ष, सहशिक्षक अशोक गायकवाड सर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व मानवजातीचे कल्याण केले आहे असे सांगून जिवन चरित्र व सामाजिक संघर्षमय कार्यावर विचार मांडून अभिवादन केले*
उपस्थित विद्यार्थांनी महामानवाचरणी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे, माजी अध्यक्ष अशोक म्हसकर, मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड,सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.