
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : १३ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय आणि १० वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना विशेष ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना हा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना असेल. विराटनं आतापर्यंत भारतीय संघासाठी आतापर्यंत ९७ कसोटी सामने खेळले आहेत.
आगामी दक्षिण आफ्रिका दौरा विराट कोहलीसाठी खूप खास असणार आहे.
विराट कोहलीनं जून २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं होतं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा केपटाऊन येथील तिसरा कसोटी सामना हा कोहलीचा १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. १०० कसोटी सामने खेळणारा विराट हा १२ वा भारतीय खेळाडू ठरेल. ११ जानेवारीला हा सामना सुरू होईल. हा दिवस विराट कोहलीसाठीही खास आहे. विराट अनुष्काची कन्या वामिकाचा पहिला वाढदिवसही ११ जानेवारी रोजी आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी विराट अनुष्काला कन्यारत्न झालं होतं.
त्यानं आपल्या कारकिर्दीत २७ शतकं आणि २७ अर्धशतकं ठोकली आहेत.
विराट आतापर्यंत ९७ कसोटी सामने खेळला आहे. परंतु सध्या त्याचा फॉर्म तितका चांगला नाही. विराटनं ९७ कसोटी सामन्यात १६४ डावांमध्ये ५०.६५ च्या सरासरीनं ७८०१ धावा केल्या होत्या या कसोटी मालिकेत त्याला ८००० धावा पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. विराट यापासून १९९ धावांपासून दूर आहे.