
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याला 9व्यांदा हा सन्मान मिळाला आहे. (फोटो-एएफपी) भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन सध्या कसोटी क्रिकेटमध्ये जोरदार फॉर्ममध्ये खेळत आहे.न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की तो बेस्ट टेस्ट मॅच विनर आहे.
यानंतर अश्विनने सर्वाधिक ‘मॅन ऑफ द सिरीज’च्या बाबतीत जॅक कॅलिसची बरोबरी केली आहे. तर सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज मिळवण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या (11) नावावर आहे. अश्विनने शेन वॉर्न, रिचर्ड हेडली आणि इम्रान खान यांना मागे टाकले असून या तिन्ही खेळाडूंनी आठ वेळा हे स्थान गाठले आहे. (एएफपी)
मुथय्या मुरलीधरनने 133 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 61 मालिका खेळून 11 वेळा हा मान मिळवला आहे. पण भारताचा अश्विन केवळ 81 सामन्यांत 33 मालिका खेळून 9 वेळा मालिकावीर ठरला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने 61 कसोटी मालिकेत 9 वेळा हा मान मिळवला आहे.
याशिवाय भारताच्या विजयानंतर रविचंद्रन अश्विनने मायदेशात 300 कसोटी बळी घेणार्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये प्रवेश केला. भारतासाठी अश्विनपूर्वी, हा पराक्रम फक्त अनिल कुंबळेने केला आहे, ज्याने आपल्या देशात 350 विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळे आणि अश्विननंतर हरभजन सिंग (265) आणि कपिल देव (219) यांचा क्रमांक लागतो. (एएफपी)
रविचंद्रन अश्विन हा एका कॅलेंडर वर्षात कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. यापूर्वी त्याने 2015, 2016 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेने ही कामगिरी तीन वेळा केली आहे. कुंबळेने 1999, 2004 आणि 2006 मध्ये एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेतले. (एएफपी)
अश्विनने आतापर्यंत 81 कसोटी सामन्यात 24.12 च्या सरासरीने 427 बळी घेतले आहेत. यादरम्यान अश्विनने 30 वेळा इनिंगमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळे (619 विकेट्स) आणि कपिल देव (434 विकेट्स) यांच्यानंतर अश्विन भारताचा कसोटीतील तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.