
दै चालु वार्ता वृत्तसेवा
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून देवाळे ता.करवीर जि. कोल्हापूर येथे छ.संभाजी महाराज भिशी मंडळ,सामाजिक सभागृह कृती समिती,तसेच निळारक्षक तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने *ई–श्रम(केंद्र पुरस्कृत) नोंदणी, स्वराज जनरल कामगार सेना नोंदणी(बांधकाम कामगार), आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे* अशा प्रकारच्या विविध शासकीय योजनांचे नोंदणी शिबिर पार पडले,या शिबिरासाठी देवाळे गावातील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन हनुमान पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव पाटील यांच्या हस्ते तर शिबिराचे उद्घाटन भोगावती साखर कारखान्याचे ऑफिस अटेंडन्ट सुरेश कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी देवाळे गावचे उपसरपंच संजय धुमाळ,ग्रामसेवक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम सफल करण्यासाठी कृती समितीचे दीपक देवाळकर, संदीप पाटील, कुलदीप देवाळकर, नितीन कांबळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.