
पन्हाळा रहिवासी व.भारतीय दलित महासंघ यांच्या आंदोलनाला यश त्यांच्या सर्व मागण्या मान्य
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
पन्हाळा चा मुख्य रस्ता जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे वाहून गेला भूसंकलन झाले त्यानंतर पर्यायी रस्त्याने वाहतूक चालू होती अचानक सार्वजनिक बांधकाम ने टू व्हीलर साठी मुख्य रस्ता सुद्धा बंद केला होता त्यात पुन्हा अवकाळी पाऊस चार दिवस झाला आणि त्यानंतर पर्यायी रस्त्याने सुद्धा चिकल निर्माण झाल्यामुळे तिथून ही टू व्हीलर फोर व्हीलर येण्यास कठीण परिस्थिती निर्माण झाली होती याकरिता आज पन्हाळा तहसील कार्यालय वर आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम चे वरिष्ठ अभियंता आयरेकर यांनी ग्वाही दिली की लवकरात लवकर आम्ही मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करू तसेच गुणवंत चांगल्या दर्जाची काम करू असे आश्वासन दिले तसेच टू व्हीलर ही कायदेशीर रित्या आम्हाला सोडता येत नाही तरी पण आम्ही प्रयत्न करू असे सांगितले व नागरिकांनी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेट काढून टाकले व टू व्हीलर साठी रस्ता चालू केला व नागरिकांना विनंती करण्यात आली की आपल्या जबाबदारीवर इथून जायचे आहे तसेच आयरेकर साहेब पुढे म्हणाले मार्च अखेरपर्यंत या रस्त्याचे पूर्ण काम करून पन्हाळगडाच्या रहिवाशांना लवकरात लवकर करून देऊ असे आश्वासन दिले नगरपालिकेच्या वतीने पर्यायी रस्ता केलेला आहे त्या ठिकाणी नगरपालिकेचे माने यांनी पुन्हा ज्या ठिकाणी चिखल झालेला आहे खड्डे पडलेले आहे ती पुन्हा मोजूवुन घेऊ व ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी काम करून घेऊ असे माने यांनी पण आश्वासन दिले तसेच माननीय तहसीलदार रमेश शेडगे या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मुख्य रस्त्याचे काम करून घेण्यास सांगितले व पर्यायी रस्त्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यास सांगितले आहे यावेळी भारतीय दलित महासंघ चे प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांत कांबळे (आप्पा) यांनी हे काम जर लवकरात लवकर झाले नाही तर येत्या 26 जानेवारीला कोल्हापूर जिल्हाधिकारी या ठिकाणी सामुदायिक आत्मदहन केले जाईल तसेच समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही कधीच गप बसणार नाही असे जाहीर केले व या होणाऱ्या परिणामाला सार्वजनिक बांधकाम कोल्हापूर जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे सांगितले तर पन्हाळा रहिवाशांकडून माननीय नगरसेवक चैतन्य भोसले व नगरसेवक वकील रवींद्र तोरसे यांनी सुद्धा प्रशासनाला जाब विचारला व लवकरात लवकर काम करून घेण्यास सुनावली तसेच दैनिक चालू वार्ता यांनी आज ही बातमी लावल्यामुळे रहिवाशी भारतीय दलित महासंघाचे शेकडो कार्यकर्ते आज पन्हाळगडावर आले होते भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांत कांबळे यादी दैनिक चालू वार्ता चे आभार मानले या आंदोलन करता चंद्रकांत काळे,बन्सी कांबळे,प्रकाश गोंधळी ,महेश हळकुंडे,दयानंद शिवजातक श्रीनिवास साळुंखे ,अक्षय सोरटे, पिंटू चव्हाण, काशिनाथ भुरुड अजित पवार ,दगडू पवार ,प्रकाश सावंत, व पत्रकार आनंदजी जगताप, नितीन भगवान उपस्थित होते