
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
शहादा शहर परिसरातील डोंगरगाव रस्त्यावर स्थित श्रीराम सिटी-2 मधील दोन घरे फोडून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.
4 ते 5 दिवस अगोदर कहाटूळ वडाळी परिसरातील 7 गावांमध्ये चोरीची घटना घडली असता परत काल डोंगरगाव परिसरात चोरी झाली असून तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांपुढे चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान उपस्थित झाले आहे.
श्रीराम सिटी सेक्टर 2 मधील दोन घरे फोडण्यात चोरांना यश आले.
रहिवासी च्या सांगण्यानुसार अंदाजे रविवारी कॉलनीत अनोळखी व्यक्ती आलेले होते,कुणी वस्तू विकायला तर कुणी अनाथ मुलासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी आले होते,कॉलनीतिल दोन घरांमधील रहिवाशी बाहेरगावी गेले असल्याने घरे बंद अवस्थेत होती त्याच घरात चोरीची घटना घडली आहेत.अद्याप कुणीही तक्रार केलेली नाही.
पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी जनतेला वारंवार आवाहन केले होते की आपल्या परिसरात कुणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे ओळखपत्र तपासा , फोटो काढून घ्या किंवा पोलिसांशी संपर्क करावा.