दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
शहादा शहरात सध्या शहादा न. पा. मार्फत १२ व १३ वार्डां मधील रस्त्यांची कामे सुरू केली असून सदर कामांच्या हदीत वाहनांची रहदारी बंदोबस्तासाठी ठेकेदारांनी कुठलीही उपाययोजना केली नाही. वाहनधारकांना फलक नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. किंबहुना फलक नसल्याने वाहनधारकांना डबल फेरी मारावी लागते. त्यामुळे पायदळ चालणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी मोठ्या वाहनधारकास वाहन परत फिरवणेस आटापिटा करावा लागतो. शहादा न. पा. कडून सदर बाबतीत त्वरीत दखल घेऊन संबंधीतांविरूधद कायदेशीररीत्या कार्यवाही व्हावी अशी मागणी नागरीकांकडून होते आहे.
तसेच शहादा शहरातून पाटचारी यांच दोन्ही वार्डांमधून गेल्या आहेत. सध्या सदर पाटांमधे पाण्यासह इतरत्रही सडक्या दुर्गंधी पसरविणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर भरलेल्या असून त्यामूळे पाण्याचा प्रवाह थांबल्याने परिसरांत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. यांमुळे नागरीकां च्या आरोग्याच्या समस्या वाढत असून परिणामी परिसरांत पर्यावरणाचेही संतूलन खराब झाल्याने कोरोना व आता येऊ घातलेला ओमायक्रॉन ची भिती नागरांमधे पसरली असल्याचे कळते. यांबाबत शहादा न. पा. चे नगराध्यक्ष व संबंधीत प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. तसेच यांबाबत म. जिल्हाधिकारी नंदुरबार यांनीही दाखल घेऊन कार्यवाही करावी.कारण शहादा न. पा. ने सदर पाटात परिसरातील (काॅलणी) च्या गटारींचं पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य धोक्यात येण्याची भिती नागरीकांमधे वाढली असलयाचे कळते. म्हणून परिसरातील नागरिकांनी सदर बाबतीत त्वरीत दखल घेऊन कार्यवाही व्हावी. अशी मागणी नागरिकांकडून होतआहे.