
दै.चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
नांदेड:-महाराष्ट्र राज्यातील एकुण ३६ जिल्हयापैकी नांदेड जिल्हा हा लसीकरणाबाबतीत ३५ व्या स्थानावर असल्यामुळे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनी कोव्हिउ- १९ लसीकरणाची नांदेड जिल्हा १०० टक्के उदिष्ट पुर्ण करण्यासाठी आज दिनांक ०९.१२.२०२१ रोजी संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी सर्व विभागप्रमुख तसेच मुख्याध्यापक सर्व माध्यम व सर्व व्यवस्थानाच्या शाळा यांची आढावा बैठक आयोजित केली होती. याबैठकीस मार्गदर्शन करून काम पुर्ण करण्यासाठी सुचना केल्या. व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी व प्राथमिक आरोग्य केंद्र पानशेवडी यांनी लसीकरण मोहीम यशस्वी रित्या राबवून तालुक्यात उत्कृष्ट काम केले. पानशेवडी गावातील लोकसंख्या 2133 लसीकरण पात्र लाभार्थी 1568 पैकी 1514 लोकांना लसीकरण करून तालुक्यात चांगले काम केले याबद्दल सौ वर्षा ठाकुर मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ सौ फरनाज शेख व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल यांचा पुष्पहार देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, गट विकास अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, आरोग्य विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी
उपस्थित होते.