
दैनिक चालू वार्ता
प्रा. मिलिंद खरात .
पालघर प्रतिनिधी.
वाडा तालुका.
आज 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिना निमित्त
आपले मानवाधिकार फाउंडेशन मार्फत आ.लं.चंदावरकर कनिष्ठ महाविदयालयात “आपले संविधान आपले अधिकार” कार्यक्रम साजरा करण्यांत आला.
या कार्यक्रमाचे आयोजन आपले मानवाधिकार फाऊंडेशन पालघर जिल्हा कार्यकारणी ने केले. कार्यक्रमा चे अध्यक्षस्थान डॉ. दिपेश पष्टे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून आ. लं.चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. पाटील सर,उपप्राचार्य व्ही. टी. मोकाशी सर, आपले मानवाधिकार फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीमती. अनिता ताई सातपुते, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद खरात, पालघर जिल्हा प्रमुख श्री. सागर पाटील, जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य दीवेश सर, वाडा तालुका अध्यक्ष राजू ठाकरे,शेजवलकर मैडम तसेच भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. दिनेश भोईर साहेब, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. दीपेश पष्टे व प्राचार्य श्री. पाटील सर, उपप्राचार्य श्री.मोकाशी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले याप्रसंगी आ .लं चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. पाटील सर व उपप्राचार्य श्री. व्ही. टी. मोकाशी सर यांना भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिका प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ. दीपेश पष्टे सर यांनी आज जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त आपले संविधान आपला अधिकार या विषयाच्या अंतर्गत मानवाचे हक्क, अधिकार, कर्तव्य ,जबाबदारी या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले .कॉलेज जीवनातच आपल्याला वरील गोष्टींची जाणीव व्हावी म्हणून विशेष करून कनिष्ठ महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आपले हक्क, आपले अधिकार ,आपले कर्तव्य याची जाणीव करून देऊन जनजागृतीचे कार्य तरुणाई जोमाने करू शकते असा विश्वास व संदेश डॉ. दीपेश पस्टे सर यांनी व्यक्त केला या प्रसंगी प्राचार्यांनी शालेय व महाविद्यालय जीवनातच शिस्त व आपली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले .तसेच उपप्राचार्य यांनी आपले संविधान व आपली जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.