
दैनिक चालू वार्ता
प्रा. मिलिंद खरात .
पालघर प्रतिनिधी.
वाडा तालुका.
आज जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, व पत्रकारिता क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध मान्यवरांना मानाचा समजला जाणारा समाजरत्न व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ आदिवासी आणि दुर्गम भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे, उत्तम प्रशासक विद्यार्थ्यांचे लाडके मनमिळावू व शिस्तप्रिय असणारे आ. ल .चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर .एस. पाटील सर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .त्याच बरोबर पी. जे. हायस्कूल मधील सहशिक्षक श्री अनिल गायकवाड सर यांनी आदिवासी आणि दुर्गम भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य वीस वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे केले म्हणून त्यांना भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान चा मानाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करणारे व करोणा च्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर बेनके यांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर या ग्रामीण भागात गोरगरीब आणि आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक संस्था स्थापन करणारे व मोफत शिक्षण देणारे डॉक्टर वीरेंद्र भोईर सर यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच गेले बावीस वर्ष समाजकार्य ,क्रीडाक्षेत्र, पत्रकारिता व विशेष करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रक्त कर्ण म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक किरण थोरात सर यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .तसेच शैक्षणिक सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्य करणारे व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे जनसामान्य न्याय मिळवून देणारे, दैनिक चालू वार्ताचे पालघर जिल्हा प्रतिनिधी व आपले मानवधिकार फाऊंडेशनचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद खरात सर यांनाही जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आ.लं.चंदावरकर कनिष्ठ महाविदयालयात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. दिपेश पष्टे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून आ. लं.चंदावरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. पाटील सर,उपप्राचार्य व्ही. टी. मोकाशी सर, आपले मानवाधिकार फाऊंडेशन च्या महाराष्ट्र राज्य प्रमुख श्रीमती. अनिता ताई सातपुते, पालघर जिल्हाध्यक्ष मिलिंद खरात, पालघर प्रमुख श्री. सागर पाटील, जनसंपर्क प्रमुख दीवेश सर, वाडा तालुका अध्यक्ष राजू ठाकरे,शेजवलकर मैडम तसेच भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक दिनेश भोईर साहेब, सौ. रोठे ताई तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पष्टे, भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दिनेश भोईर व प्राचार्य श्री.पाटील सर , उपप्राचार्य श्री. मोकाशी सर यांनी केले. या पुरस्कार वितरण सोहळ्याला वाडा शहरातील नागरिक , विविध संस्थांचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते , कॉलेज मधील विध्यार्थी विध्यार्थीनी उपस्थित होते.