
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर प्रतिनिधी.
*काॅग्रेसचे अनंता वनगा साहेब आमच्या पाड्यात आले म्हणजे आमच्या समस्या सुटणार हा विश्वास आहे-*
*अमित फुफाणे*
*स्थानिक रहिवासी* *डोंगरपाडा.*
*नव्यानेच सुरू झालेले दैनिक चालू वार्ता* *वर्तमानपत्र हे पालघर जिल्हात* *प्रसिध्दी होत आहे. जनसामान्यांच्या* *सार्वजनिक समस्या, अडी-अडचणी शासन , प्रशासन, सरकार पर्यंत पोह्चवून पाठपुरावा करणारे व निस्वार्थी पणे समाजसेवा करणारे समाजसेवक यांच्या सदैव सोबत असणारे वर्तमानपत्र आहे.पालघर जिल्ह्या तील आदिवासी समाजाच्या समस्या रोजच बातमी रूपाने प्रसिद्ध करणारे वर्तमानपत्र आहे.*
*-अनंता वनगा.*
*कॉंग्रेसपक्ष* *पालघर जिल्हा सचिव.*
वाडा तालुक्यातील गारगाव गावाचा डोंगर पाडा मधील अमित
फूफाने यांनी त्यांच्याच शब्दात सांगितली घडलेली विकास कामांची सुरवात कशी झाली.
पालघर जिल्हा काॅग्रेस *कमिटीचे सचिव अनंता वनगा साहेब यांनी कार्यकर्त्यांन सोबत या पावसाळ्यात वाडा तालुक्यातील गारगाव जिल्हापरिषद गटातील गारगाव डोंगरपाडा* या आमच्या आदिवासी लोकवस्तीची पाहणी केली होती, त्यावेळेस आम्ही स्थानिक आदिवासी जनतेने वनगा साहेबांसमोर समस्यां मांडल्या होत्या,त्या मध्ये प्रमुख मागणी रस्त्यांची होती तर दुसरी विजेची होती,या दोन्ही मागण्या ऐंकुन वनगा साहेबांनी सांगितले होते की तुम्ही सर्वजन संघटीत राहिले तर काम करायला सोपे जाईल,तेव्हा पासून वनगा साहेबांनी आम्हाला वाडा पंचायत समितीत बोलावुन आमच्या समोर संबधित अधिकाऱ्या सोबत निवेदन देवून,चर्चा व पाठपुरावा करुन पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंता अधिकाऱ्यानी शाखा अभियंता सुशिल कटारे यांना गारगाव मेनरोड ते डोंगरपाडा रस्त्यांची पहाणी करुन अहवाल सादर करणेस सांगितले होते,
तेव्हा दि ८/१२/२०२१ रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास गारगाव मेनरोड ते डोंगरपाडा रस्त्यांची पहाणी करणेसाठी अधिकारी आले व मोजमापे घेण्यात आली त्यामध्ये तीनशे मीटर ही जागा खाजगी मालकी असुन पक्क्या रस्त्यांसाठी कुणाचीही अडचण नाही व येत्या दहा दिवसांत रोजगारहमी योजनेतून काम सुरु करु असे शाखा अभियंता कटारे यांनी सांगितले व पुढे एक किलोमीटर ही वनविभागाची जमीन असुन ३/२ चा प्रस्ताव तयार करुन वनविभागाची मंजुरी आली की काम केले जाईल व त्यासाठी वनगा साहेब आपण वनविभागाच्या जागेतून जाणारया रस्त्यांच्या जागेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करा म्हणजे लवकर परवानगी मिळेल व काम करणे सोपं जाईल असे सुशील कटारे यांनी सांगितले,
सदर रस्त्यांची पहाणी करुन मोजमाप घेण्यासाठी जंगलातून वाट काढत जात असताना पंचायत समितीचे सुशील कटारे,त्यांच्यासोबत पालघर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे सचिव अनंता वनगा साहेब,वाडयाचे आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक अरुण खुलात साहेब तसेच आम्ही स्थानिक रहिवासी उपस्थीत होतो. अशी माहिती अमित फुफाणे, स्थानिक रहिवासी गारगाव डोंगरपाडा यांनी दिली.