दैनिक चालू वार्ता.
प्रा. मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
गेल्या तिन/चार वर्षापासून प्रलंबित असलेले १२ व २४ वर्षा चे सेवांर्तगत प्रशिक्षण ऑनलाईन घेण्याबाबत शासनाने आदेशित केलेले आहे.
सदर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी रुपये २०००/- शुल्क लागू केलेले असून आत्तापर्यंत ची सर्व सेवांर्तगत प्रशिक्षण शासनाने मोफत दिलेली असून या वर्षापासून लागू केलेल्या शुल्का विरोधात राज्य *महासंघाने तिव्र विरोध* करुन संबंधित अधिकारी व मंत्रीमहोदया बरोबर पत्रव्यवहार करुन चर्चा झालेली असून सूध्दा शासनाने अद्याप सदरचे शुल्क रद्द केलेले नाही. म्हणून महासंघाने ज्यू. कॉलेज टीचर्स ला खालील आवाहन केले.
_*या निवेदनाव्दारे पात्र प्रशिक्षणार्थी शिक्षकांना सुचित करण्यात येते की कोणीही सदरचे २०००/- शुल्क भरु नये.*_
शासन जाणीव पुर्वक निर्णय घेण्यास उशिर करत असल्याने *राज्य महासंघ तिव्र राज्यव्यापी आंदोलन* करण्याच्या तयारी असून शासनास शिक्षकांना पुर्वीप्रमाणे मोफत प्रशिक्षण देण्यास भाग पाडू …
त्वरीत निर्णय न झाल्यास लवकरच आंदोलन छेडले जाईल असे *महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे सरांनी जाहीर केले*, त्या प्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करुन लढा यशस्वी करावा,ही विनंती केली.
*आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढणारी एकमेवद्वितीय संघटना म्हणजे फक्त आणि फक्त राज्य महासंघ*…
जागे रहा, एक व्हा,
संघटनेला पाठबळ द्या,
विजय आपलाच आहे…अशी माहिती
प्रा सुनिल पूर्णपात्रे,*
*उपाध्यक्ष*
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ यांनी दिली.