
दैनिक चालू वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर जिल्हा प्रतिनिधी.
*जि. प. शाळा डोहाळे पाडा येथे जागतिक मानवाधिकार दिन साजरा.*
*विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकार व हक्कांविषयी जागृत राहिले पाहिजे*- सहशिक्षक अशोक गायकवाड सर
*जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी ता.भिवंडी येथे 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिवस मानवी हक्क दिन म्हणून संपन्न झाला*
या वेळी मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून *मानवी हक्क दिन* या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना संबोधून सहशिक्षक अशोक गायकवाड बोलत होते. मानवाधिकार म्हणजे काय?10 डिसेंबर हा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून आपण का साजरा करतो? मानवाधिकार हा दिवस 10 डिसेंबर 1948 पासून जागतिक स्तरावर जरी साजरा होत असला तरी आपल्या देशाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी विश्वरत्न भारतीय संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान बहाल केले व त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 सुरू झाली असे सांगून भारतीय संविधानात मानवाला दिलेले हक्क व अधिकार संविधानातील भाग तीन मधील अनुच्छेद 12 ते 35 हे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांशी संबधीत आहेत.जसे 1)समानतेचा हक्क 2)अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क 3)शोषणापासून संरक्षणाचा हक्क 4)धर्म स्वातंत्र्याचा हक्क
5)सांस्कृतिक व शैक्षणीक हक्क
6)संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
7)मालमत्तेचा हक्क
इत्यादी हक्कांविषयी माहिती देऊन *विद्यार्थ्यांनी व प्रत्येक नागरिकांनी आपल्या हक्क व अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे व त्यासाठी संविधानाचे रक्षण केले पाहिजे असे सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी अवाहन केले*.
या वेळी मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षिका दिलशाद शेख सहशिक्षक अशोक गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.