
दैनिक चालू वार्ता पालघर
मोखाडा प्रतिनिधी:-अनंता टोपले
आज जव्हार शहरात राजे यंशवत राव मुकणे महाराज यांच्या 104 जंयती निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यंशवतराव महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आदिवासी पंरपरा नृत्य सादर केले.यावेळी मुकणे राज घराण्यांचा इतिहास डॉ.गवारी , श्री मुकणे व श्री बुधर यांनी आपल्या भाषणात मांडला.यावेळी महादेव कोळी समाज उन्नती मंडळाच्या वतीने निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
पिण्याच्या पाणी, आरोग्य, शिक्षण, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक धोरण आजही कायम आहे.
तत्कालीन इमारती व वास्तू यांचा आजही उपयोग केला जातो.यंशवत राव मुकणे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जव्हार शहर व ग्रामीण भागातील विकास पर्यटनाच्या माध्यमातून झाला पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.महाराजांनी येथील सर्व धर्म समभाव जोपासना केली त्याच पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जव्हारच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे.असेही ते बोलत होते.
यावेळी श्री चंद्रकांत पटेल नगराध्यक्ष, श्री दिलीप पटेकर संचालक जिल्हा बँक,श्री प्रदीप वाघ माजी सभापती
श्रीमती प्रिया सुनील भुसारा श्री गणेश रजपूत, श्री भरत गारे गुरुजी, नरेंद्र मुकणे , उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वैभव मुकणे यांनी केले व सुत्र संचालन श्री अमोल मोकाशी सर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन महाराज महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र प्रदेश व जव्हार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.