
दैनिक चालु वार्ता,
शिरपूर प्रतिनिधी:- महेंद्र ढिवरे
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे यांच्या माध्यमातून ७ ते १० डिसेंबर असे चार दिवसीय ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षण संपन्न झाले. सदर प्रशिक्षण उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, धुळे यांनी भूषविले. डॉ. दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. श्रीधर देसले, प्राध्यापक, उद्यान विद्या, कृषि महाविद्यालय, धुळे, डॉ. पंकज पाटील, शास्त्रज्ञ, पिक संरक्षण, डॉ. धनराज चौधरी, शास्त्रज्ञ, पशु संवर्धन व दुग्ध शास्त्र, श्रीमती. अमृता राऊत, शास्त्रज्ञ, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी आणि सेंद्रिय शेती प्रशिक्षण समन्वयक डॉ. अतिश पाटील, शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्र इत्यादी अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
डॉ. दिनेश नांद्रे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, धुळे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामद्धे सेंद्रिय शेतीचे महत्व युवकांना पटवून दिले. सेंद्रिय शेतीमध्ये निसर्गातून उपलब्ध झालेल्या किंवा शेताच्या बांधावर कमीत कमी खर्चात तयार केलेल्या सेंद्रिय पदार्थांचाच वापर करण गरजेचे आहे. एकच पिक पद्धती, रासायनिक खतांचा चुकीचा वापर आणि सेंद्रिय खतांचा अभाव यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. सेंद्रिय कर्बाची पातळी सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीतील घटकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे असे डॉ. दिनेश नांद्रे म्हणाले.
डॉ. चिंतामणी देवकर, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, धुळे यांनी अध्यक्षणीय भाषणात विषमुक्त शेतीची संकल्पान विस्तृतपणे मांडली. आताच्या धावपळीच्या युगात जादाचे पैसे मोजून ग्राहक सेंद्रिय भाजीपाला आणि फळे खरेदी करत आहेत. जमिनीच आरोग्य तसेच माणसांच खालावत चाललेल आयुष्यमान जपण्यासाठी सेंद्रिय शेती हि आता काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय शेतीमध्ये युवकांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. सेंद्रिय शेती करण्यासाठी शास्त्रीय ज्ञानाबरोबर युवकांमध्ये चिकाटी आणि संयम असायला हवा. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या उत्पादकांना बाजारात विकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर युवक प्रभावीपणे करू शकतात. सेंद्रिय शेतीमध्ये प्रमानिकरणा बरोबर प्रामाणिकपणा हि फार महत्वाचा आहे. त्यामुळेच आपला सेंद्रिय ब्रॅन्ड बाजारात प्रस्तापित होईल, असा आशावाद डॉ. चिंतामणी देवकर यांनी व्यक्त केला.
सदर प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय शेतीची सद्य परिस्थिती, सेंद्रिय शेतीचे मुलभूत घटक, सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीने प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय खतांची निर्मिती, सेंद्रिय शेतीमध्ये पशु संवर्धनाचे व्यवस्थापन, सेंद्रिय शेती मध्ये कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय भाजीपाला आणि फळपिके उत्पादन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेतीमाल विक्री साखळी व निर्यात, सेंद्रिय शेती प्रमानिकरण पध्दती आणि मानके इ. महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन झाले.
प्रशिक्षणार्थींसाठी प्रमानिकृत सेंद्रिय शेती पाहण्यासाठी ‘सेंद्रिय शेती बहुविध प्रशिक्षण केंद्र’ वडणे ता. धुळे येथे दि. १० रोजी प्रत्यक्ष भेट आयोजित केली होती. त्याठिकाणी कृषिभूषण श्री. दिलीप पाटील यांनी जीवामृत, घानामृत, बिजामृत, व्हर्मिवॉश, गिरिपुष्पाचा वापर इ. उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक युवकांना दाखविले.
कौशल्य विकास आधारित सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे प्रशिक्षण समन्वयक म्हणून डॉ. अतिश पाटील, शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्र, कृषि विज्ञान केंद्र, धुळे यांनी प्रशिक्षणाचे नियोजन केले. सदर प्रशिक्षणासाठी डॉ. दिनेश नांद्रे, डॉ. घनश्याम काबरे, प्रा. श्रीधर देसले, श्री. शांताराम मालपुरे, डॉ. पंकज पाटील, श्री.जगदीश कथेपुरी, डॉ.धनराज चौधरी, डॉ. अतिश पाटील यांचे त्रांत्रिक मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतिश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. पंकज पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये श्री रोहित कडू, श्री जगदीश कथेपुरी, श्रीमती अमृता राऊत, श्री जयराम गावीत, श्रीमती प्राची काळे, स्वप्नील महाजन, बाळू वाघ, रमेश शिंदे, कुमार भोये इ. कृषि विज्ञान केंद्र, धुळे अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले