
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
( सुनिल पाटिल )
म्हसावद प्रतिनिधी – ग्रामीण भागात शेतकरी वर्गा साठी ASK फाउंडेशन अंतर्गत समृद्ध किसान प्रकल्प हा बायफ संस्था अंतर्गत शहादा तालुक्यातील पिंप्राणी, राणीपूर, चिरडे, नागझिरी इत्यादी गावात प्रकल्प राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये शेतकरी बांधव, महिला बचत गट ,व गावकरी, यांच्यासाठी उत्पन्न कसे वाढेल व जीवनमान कसे उंचावण्यास मदत होईल शेतकऱ्यांना फळबाग शेती कशी करता येईल व करण्यासाठी त्यानंतर सुधारित बियाणे मिळवण्याकरिता माहिती देण्यात येत आहे पिण्याच्या पाण्यासाठी काही गावांमध्ये वनराई बंधारे बांधण्यात येत आहे यासाठी बायफ संस्था मार्फत प्रकल्प राबविण्यात येत आहे अशी अधिक माहिती देण्या साठी 11/12/2021रोजी पिंप्राणी येथे गाव बैठक घेण्यात आली त्यात माननीय सरपंच साहेब, उपसरपंच, व शिवाजी गेंद्रे ,करण सिंग रावताळे , दिलदार रावताळे , भाईदास बागले, राजेंद्र चौधरी, रवींद्र रावताळे, जगन रावताळे, व इतर ग्रामस्थ होते व बायफ संस्थेचे पदाधिकारी श्री निलेश चव्हाण साहेब, श्री देवेंद्र पाटील सर, श्री गणेश पाटील सर, श्री विशाल सर, व श्री संजय पावरा सर, यांनी मार्गदर्शन केले व नागझिरी येथे वन राई बंधाऱ्याचे देखील काम झाले आहे या बंधाऱ्यामुळे नदीतील पाणी आडवून शेतासाठी कामास येत आहे व पाण्याची पातळी सुद्धा वाढत आहे