
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
पेठवडज:- अतिवृष्टीने बाधीत झालेल्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरूवात झाली असुन पेठवडज मध्यवर्ती सहकारी बैंकेत अनुदान वाटपाला सुरूवात झाली आहे. यावर्षीच्या जुलै व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईसाठी अनुदान अर्थसहाय्य करण्यात आले त्यानुसार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पेठवडज शाखे अंतर्गत येणाऱ्या तेेेेरा गावातील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे.गोणार गाव संपले असून कळका येथील अनुदान वाटप चालू आहे.अतिवृष्टीमुळे पेठवडज परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते सोयाबीन, कापुस आदी खरीप पिकामध्ये पाणी साचुन पिकांची नासाडी झाली त्याने हातात आलेले हंगाम गेला होता नुकसान भरपाईपोटी शासनाने मदत घोषीत केली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा शासनाने
जाहीर केलेले शासकीय अनुदान कधी मिळणार याकडे होत्या शासनाने कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये तर बागायतीसाठी पंधरा हजार रुपये अनुदान दिवाळीपूर्वी शासन निर्णय काढुन मंजूर केले ही दिली जाणारी मदतीची रक्कम दिवाळी नंतर जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आली होती परंतु तांत्रिक अडचणीमुळे अनुदान वाटपाला विलंब होत होता त्यामुळे ही मदत कधी मिळणार याची शेतकरी औत्सुक्याने वाट पहात होते. त्यामुळे मागील आठ दिवसापासून हे अनुदान हे पेठवडज परिसरातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.पेठवडज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक ही परिसरातील तेरा गावातील हजारो शेतकऱ्यांशी संलग्न असुन बैंकेमार्फत अनेक शेतकऱ्यांना एटीम कार्डचे देखील वाटप झाले आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होत असुन रांगेत न थांबता थेट एटिम मधुन पैसे काढता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व शेतकऱ्यांच्या अडचणी कमी झाल्याचे दिसुन येत आहे.
ज्यांना एटीम कार्ड मिळालेले नाहीत असे शेतकरी व उर्वरित शेतकऱ्यांना बैकेतुन अनुदानाची रक्कमेचे वाटप सुरु असुन इंग्रजी अक्षराच्या क्रमानुसार गावानिहाय अनुदान वाटप सुरु आहे अपुरे मुनुष्यबळ आणि खातेदारांची संख्या जास्त असल्यामुळे याकामाचा कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बैकेत गर्दी करु नये व एटीम कार्डचा वापर करुन गैरसोय टाळावी तसेच बैंकेने केलेल्या नियोजना प्रमाणे गावनिहाय वाटप सुरू असल्याची माहिती श्री रमेशराव घोरवाडे मॅनेजर साहेबांनी सुरळीत वाटप चालू असल्याचे सांगितले आहे.