
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कळका:- सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष एकादशीला श्री क्षेत्र पेंडू (बु.) येथे श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या दर्शनासाठी कळका ते पेंडू (बु.) पायी दिंडी जाणार आहे तरी परीसरातील भाविक भक्तांनी पायी दिंडीमध्ये सामील होऊन दिंडीचा लाभ घ्यावा असे धनाजी पाटील, मुरलीधर पाटील, अनिल पाटील, संभाजी पाटील, पंडित जाधव तसेच समस्त गावकरी मंडळी कळका यांनी दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड यांना सांगितले आहे.