
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदीप मोरे
शहादा,- दिनांक – १२/१२/२०२१ रविवार रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षबांधणी संदर्भात जिल्हास्तरीय बैठक मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स बिपीन रावत यांच्या सह १३ जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात केली.
नंदूरबार जिल्ह्यातील शहादा-तळोदा, अक्कलकुवा-धडगाव विधानसभा क्षेत्रामधील संघटनात्मक बांधणीसाठी जिल्हास्तरीय बैठक जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. गेली काही वर्षापासून पक्षाला मरगळ आली होती, श्री. राजेश्वर सामुद्रे यांच्या नियुक्ती नंतर नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा, तळोदा, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यात पक्षाची नवीन बांधणी करण्यात येणार आहे. गाव तेथे शाखा, गट-गण आणि शहरातील प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करण्याचे पक्षाचे पुढील नियोजन असणार आहे. तसेच पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांविषयी देखील चर्चा करण्यात आली
श्री. सामुद्रे पुढे म्हणाले की, पक्षात नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि जुने पदाधीकरी यांचा कार्यअहवाल पाहून पक्ष निरीक्षक विनयजी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुढील नेमणुका लवकर करण्यात येतील.
*पक्ष प्रवेश*– राष्ट्रवादी युवक कांग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत ईशीसह इतर युवकांनी राजेश्वर सामुद्रे यांच्या हस्ते मनसे पक्षात प्रवेश केला
यावेळी बैठकीला योगेश सोनार, दीपक लोहार, सुहास पाटील, अमेय राजहंस, विशाल पाटील, दिनेश नेरपगार, धनराज निकम, युसुफ रंगरेज, कौस्तुभ मोरे, गोपाल कोळी, प्रतिक गवळे, सलमान तेली, पियुष जोशी,एस.टी.कर्मचारी संघटनेचे रामा लहाटे, यतीश पाटील, मंगेश स्वामी, संदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते, सूत्र संचालन योगेश सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन रविकांत संजराय यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी निलेश पाटील, योगेश मराठे, कल्पेश भोई, रोहित गवळे यांनी परिश्रम घेतले.