
दैनिक चालु वार्ता,
शहादा प्रतिनिधि : क्रिष्णा गोणे
शहादा: नंदुरबार जिल्हयात मागील वर्षी नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. असेच वेगवेगळया जिल्हयात तेथील शैक्षणिक व सामाजिक ऐतिहासिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान असलेल्या महापुरुषांची नांव देण्यात आले आहेत. उदा. (1) जुहू येथे स्थितीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास हिंदू हृदयसम्राट “बाळासाहेब ठाकरे” (2) कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयास आपल्या सर्वांचे मनात आदराचे स्थान असलेल्या “छत्रपती शाहू महाराज” नाव देण्यात आले अशी अनेक उदाहरणे आहेत. नंदुरबार जिल्हयात मागील वर्षी नवीन वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यात आले तर त्याच नांव क्रांतीसूर्य धरती आबा, “जन नायक बिरसा मुंडा” नाव देण्यात यावं. नंदुरबार जिल्ह्यात लोकसंख्याच्या मुद्यावर जर विचारात घेतलं तर जिह्यातील जवळपास 80% हून अधिक लोकसंख्या असलेला आदिवासी जिल्हा आहे म्हणून नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा आहे व नंदुरबार जिल्हा हा आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आदिवासी समाजात किंवा भारताचा “इतिहासात शहीद, क्रांतीसुर्य बिरसा मुंडा” यांना मानाचे स्थान आहे म्हणून नंदुरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयास “क्रांतीसुर्य धरती आबा जननायक “बिरसा मुंडा” नाव देण्यात यावे असे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी मा.श्रीमती मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित असलेले
१). राजेश खोजल्या वळवी
२). अमरसिंग वळवी
३). राहुल वळवी
४). सुरज वसावे
५). बादल तडवी
६). अनिल वळवी
७). प्रितेश पावरा
या आधि तरुण मंडळी उपस्थित होऊन निवेदन सादर करण्यात आले.