दैनिक चालू वार्ता
आपसिंग पाडवी
अक्कलकुवा तालुका प्रतिनिधि
फुले एकादशी ही भगर कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे
राजेंद्र दहातोंडे सर व डॉक्टर एम. एस.महाजन सर केंद्रीय विस्तार विभाग धुळे ( राहुरी कृषी विद्यापीठ ) यांनी जुनवाणी येथील कार्यक्रमात ही भगर शेतकऱ्यांना देण्यात आली होती त्यातील इरमा खोजल्या वसावे यांनी आपल्या शेतात सरी पद्धतीने केलेला हा प्रयोग आहेत.
आपल्या भागात भगर टाकायची पद्धत ही फोकून देऊन पेरणी करतात पण त्यालाच आपण सरी पद्धतीने लागवड केल्यास त्याचे उत्पन्न हे दुपटीने येते हे एक खूप चांगले उदाहरण आहे.
जुनवणी गावात या वर्षी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या मदतीने या गावातील शेतकऱ्यांना फुले एकदाही हे भगरची नवीन जात उपलब्ध करुन देण्यात आली त्याच्यात इरमा खोजल्या पाडवी,दोंग्या डूशा पाडवी,दमण्या पारशी पाडवी,विऱ्या कालशा पाडवी,व इतर शेतकऱ्यांना ही भगर देण्यात आली आहे. त्याची पाहणी आज मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी,ओल्या पाडवी,आपसिंग वसावे,दमण्या पाडवी यांनी केली आपण साध्या पद्धतीने लागवड केलेली भगर आणि सरी पद्धतीने केलेल्या पद्धतीत खूपच फरक जाणवला असे जुनवाणी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत.