
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
संतप्त ग्रामस्थांनी गावात विकास कामे वर्षानुवर्षे होत नसल्याने पंचायत समिती गाठली.
नंदुरबार: शहादा तालुक्यातील कमरावद गावातील लाखोंचा निधी येऊनही गावात अनेक वर्षांपासून विकास कामे झालेली नाहीत.
या अनुषंगाने सरपंच ,ग्रामसेवक यांना वारंवार सांगूनही ग्रामस्थांनी मांडलेले समस्याकडे दुर्लक्ष केले व तुमच्या कडून जे होईल ते करा असे बिनकामाचे प्रश्न उपस्थित करतात असे उत्तरे मिळाली .त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ता अनिल कुवर याच्या मार्गदर्शनाखाली कमरावद गावातील ग्रामस्थांनी आज पंचायत समिती गाठली व आपले म्हणणे गटविकास अधिकारी यांना निवेदन मार्फत सादर केले.
गावात घरकुल,आरोग्यचे प्रश्न,गाव अंतर्गत रस्ते,गटारी,हातपंप नादुरुस्त, पिण्याच्या पाण्याची टाकीत घाण साचलेली,दोन वर्षांपासून गावात ग्रामसभा झालेल्या नाही असे अनेक समस्या गावात असून याची तात्काळ चौकशी व्हावी व दोषी अधिकारीवर कार्यवाही करण्यात यावी .अन्यथा येणाऱ्या दिवसात आमरण उपोषण छेडू असा इशारा निवेदन मार्फत गटविकास अधीकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले आहेत.