
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
सर्व देवतांचे, सर्व उपास्यांचे, उपासकांचे मूळ तत्त्व आपला आत्मदेव आहे. तपश्चर्या, धर्म-परायणता अंतःकरणाला शुद्ध करते. उपासना अंतःकरणाला एकाग्र करते. जितके त्याला एकाग्र करता, तितक्याच शक्तीसुद्धा येतात. कोणी सोन्याची लंकासुद्धा मिळवू शकतो उपासनेच्या बळाने! परंतु मूळ तत्त्व जे आहे सृष्टीचे इष्टदेवाचे… आपले मूळ तत्त्व… त्याचा साक्षात्कार झाला नाही तर कालांतराने सर्व खाली पडतात, पतित होतात. जसे कमाई झाली आणि खर्च झाला. तोटा झाला आणि मग नफा झाला तेव्हा तोटा भरून निघाला. अशा प्रकारे वर-खाली चौदा लोकांमध्ये मनुष्य चकरा मारत राहतात. उत्थान- पतन, उत्थान-पतनाच्या चक्रात फिरत राहतात, तर आता उत्थान-पतन नाही करायचे आहे. जन्म-मरणाच्या चक्रात नाही यायचे आहे.
जो इष्टदेवाचीपूजा- अर्चना करतो त्याला गुरुदेव भेटतात आणि गुरुदेवही कित्येक प्रकारचे असतात. त्यांच्यातही तत्त्ववेत्ता, आत्मसाक्षात्कारी गुरू खूप दुर्लभ असतात. ते भेटले तर संस्कार देतात की ‘वल्स! तू आत्मतत्त्व आहेस.’ जोपर्यंत तत्त्ववेत्ता गुरू भेटले नव्हते तोपर्यंत मलाही ठाऊक नव्हते की आत्मसाक्षात्कार काय असतो, तुम्हालाही ठाऊक नव्हते; कोणालाही ठाऊक नव्हते.
…तर सृष्टीच्या मूळ तत्त्वाचा अनुभव करणे खूप सोपे आहे. कर्मी (कर्मकांडी) कर्म करून करून थकून जाईल, उपासक उपासना करून करून कित्येक जन्म व्यतीत करेल… पण हे तत्त्वज्ञान, हा आत्मसाक्षात्कार एका आठवड्यातही होऊ शकतो, इतका सोपा आहे! परीक्षित राजाला एका आठवड्यात झाला होता. त्यांना शुकदेव मुनींचा उपदेश मिळाला आणि कशी तळमळ होती की अन्न-जल सोडून सत्संगातच बसून रहायचे, खाण्या-पिण्याचीही शुद्ध राहत नव्हती. कारण मृत्यू समोर आहे! सत्संगाचा एक शब्दसुद्धा खाली जाऊ देत नव्हते. शेवटी गुरु म्हणाले तो (आत्मा-परमात्मा) तूच आहेस. आणि त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. खूप श्रेष्ट गोष्ट आहे. याच्या श्रेष्ठतेपुढे दुसरे काहीच नाही.
आत्म्याचे स्वरूप काय आहे?
आत्मा कशाला म्हणतात ?
जेथून’मी’, स्फुरित होतो. सर्वांच्या हृदयात ‘मी’, ‘मी’ होते.तर इतका व्यापक आहे हा… हा तर आपल्या चामड्याच्या आत बोलतात की इकडे आहे, इकडे आहे. बाकी फक्त इकडेच नाही, सर्वत्र तोच आहे… वृक्षांमध्येही हाच आत्मदेव रस खेचण्याची सत्ता देतो. ही जी पक्ष्यांची किलबिल होत आहे,हीसुद्धा आत्म्याच्या सत्तेनेच होत आहे. या झाडा झुडपांमध्ये, दगडांमध्येही तीच आत्मचेतना आहे;परंतु त्यांच्यात सुषुप्त आहे. संपूर्ण जगत त्या आत्म्याचेच विवर्त* आहे. जसे समुद्राची एकही लाट समुद्रापासून वेगळी नाही, असेच सृष्टीचा एक कणसुद्धा आत्म्यापासून वेगळा नाही.
एकदा त्या आत्मा- परमात्म्याला जाणून घ्या, त्यात ३ मिनिटे बसा, टिका… गुरूंच्या कृपेने फक्त ही ३ मिनिटांसाठी आत्मसाक्षात्कार झाला तर तुम्ही पार झालात.. मग गर्भवास होत नाही, जन्म मरण होत नाही..