
दैनिक चालू वार्ता
म्हसावद सर्कल( सुनील पाटील )
म्हसावद प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी मनीषा खत्री मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये 15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी
6 वाजेपासून 29 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
सदरचे आदेश लग्नकार्य मिरवणुका तालुका आठवडे बाजार किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाही. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी ,कर्मचारी यांना ,सभा नगर मिरवणूक काढण्यास रीतसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाच्या भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.