दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
पेठवडज:- मौ.पेठवडज ता. कंधार येथे छत्रपती शिवाजी चौक परिसर व गावच्या चारही बाजूंनी सरास मटका व अवैध दारू विक्री होत आहे. याचा परिणाम युवक वर्गासह गावकऱ्यांना खुप मोठ्या प्रमाणत आर्थिक, मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी यातून अनेक कुटूंबे उद्धवस्त झाली आहेत तसेच युवक व महिला यांना बाहेर फिरणे अतिराय त्रासदायक होत आहे,याविरुद्ध तहसीलदार साहेबांनी कठोर निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी विनंती गजानन तुकाराम जाधव (प्रधान सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा,कंधार जिल्हा नांदेड)यांनी केली आहे.