
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी कलंबर हनुमंत श्रीरामे
कलंबर :- संजय गांधी मा. व उ.मा.विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. शिवानंद गुंडे हे यवतमाळ येथे उपशिक्षणाधिकारी पदी कार्यरत होते. त्यांना शासनातर्फे बढती देण्यात आली असून त्यांना आता यवतमाळ जिल्हाचे शिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते कलंबर सर्कल मधील गुंडेवाडीचे रहिवासी आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर चे अध्यक्ष श्री. मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड साहेब व संजय गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. मामडे साहेब यांनी पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी श्री. गुंडे साहेब यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. असे बळीराम पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. भोपाळे साहेब यांनी दैनिक चालू वार्ता शी कळवले आहे.