
दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी भानुदास पवार
जळगाव– लहुजी ब्रिगेड अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पदी सुगरा बी. युसुफ शेख तर जिल्हा सरचिटणीस पदी नरगीस बी.अब्दुल समद यांची निवड लहुजी ब्रिगेड अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा यास्मिन शेख यांनी ही निवड केली असून नियुक्ती करतांना अल्पसंख्यांक महीला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा फिरोजाबी पठान तर लहूजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष श्री.सुरेशभाऊ अंभोरे , अल्पसंख्यांक चे प्रदेश अध्यक्ष शेरखान लहुजी ब्रिगेड ओबीसी प्रदेश अध्यक्ष श्री.सुनिल चौधरी ,शफिका बी. सैय्यद लहुजी ब्रिगेड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री.भानुदास पवार इत्यादी पदाधिकारीच्या उपस्थित हि निवड करण्यात आली. सदर निवड लहुजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अल्पसंख्यांक अध्यक्षा यास्मिन शेख व लहुजी ब्रिगेड महिला आघाडीच्या अल्पसंख्यांक उपाध्यक्षा फिरोजाबी पठान यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.