
दैनिक चालु वार्ता.
मिलिंद खरात.
पालघर प्रतिनिधी.
भिवंडी.
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील इ.1 ते 4 च्या शाळा 1 डिसेंबर 2021 पासून राज्यातील काही जिल्ह्यात नियमित सुरू झालेल्या आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी ठाणे यांचे आदेशानुसार दि.15 डिसेंबर 2021 पासून होत आहेत.गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा पादुर्भाव असल्या कारणाने शाळा बंद होत्या पण online शिक्षण सुरू होते. असे असले तरी online शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध नसल्या कारणाने जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत offline अध्ययन अध्यापन सुरूच होते. परंतु आता शासनाच्या आदेशानुसार शाळा नियमित सुरू होऊन विद्यार्थी दीड वर्षानंतर नियमित शाळेत येऊन प्रत्यक्ष शिक्षण घेणार आहेत ही अतिशय आनंदाची व स्वागतार्ह बाब लक्षात घेऊन,विद्यार्थ्यांनी आनंदाने शाळेत यावे व प्रसन्न मनाने अध्ययन अध्यापन करावे या उद्देशाने जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी ता भिवंडी येथे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थी स्वागत कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांचे सॅनिटायजर, मास्क,एक फुगा,एक वही,चाॅकलेट व कुंकम तिलक करून आनंदाने उत्साहात स्वागत करण्यात आले.तद्नंतर विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केल्यानंतर स्त्री शिक्षणाच्या जनक महामाता सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विष्णू मोरे यांनी केले.सर्व विद्यार्थांनी पुष्प अर्पण करून वंदन केले.
या प्रसंगी सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आज पासून नियमित शाळा सुरू होतात ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे.विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले पाहिजे.शिक्षणा शिवाय माणसाला पर्याय नाही.शिक्षण ही आपली जिवणावश्यक बाब बनली आहे. म्हणून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा! असे सांगून शुभेच्छा दिल्या.तसेच ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला डोहोळे ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव , शाळाव्यवस्थापन अध्यक्ष विष्णू मोरे,सदस्या अनिता मोरे,ग्रामस्थ सुदाम वाघे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख व विद्यार्थी उपस्थित होते.