
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी अजय चव्हाण
महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथे किरकोळ वादातून एका बंजारा समाजाच्या तरुणाला निर्घृणपणे भर दिवसा चौकात जिवे मारण्यात आले. श्याम शेषेराव राठोड (२४) असे असून त्यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळावा,यासाठी १७ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वसंत उद्यान कारला रोड पुसद येथे गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोर सेनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. सदरील खुनाचा खटला फास्टट्रॕक कोर्टात चालविण्यात यावा.याकरिता सरकारी वकीलांची नेमणूक करावी.आरोपीला फाशीच्या शिक्षेसह जन्मठेप देण्यात यावी.
पीडित कुंटुबाला मदत म्हणून २५ लाख रुपयांची शासनाने मदत करावी.कुंटुबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नौकरी देण्यात यावी, मागण्यांना घेऊन गोर सेना वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संंदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केले आहे.